लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 05 नोव्हेंबर :- मालकाचा विश्वास संपादन करून लाखों रूप्यांचे सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट आणि विदेशी कंपनीचे घड्याळे चोरी केलेल्या नोकरास बिहार येथून 24 तासांच्या आत अटक करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. श्रीकांत चिंतामणी यादव (34) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील 12 वर्षापासून हाउस किपींग मॅनेजर म्हणून काम करणार्या नोकराने फिर्यादीच्या राहत्या घरातील कपाटाच्या बनावट चावी बनवून लाॅक मधुन जवळपास 41 लाख 50 हजार रूपए किंमतीचे सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट, घड्याळे व रोख रक्कम चोरी करण्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथक चे सहा. पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोउनि इंद्रजित भिसे करत असतांना आरोपी आपल्या मुळ गावी गेल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून पोलीस पथक तात्काळ आरोपीच्या मुळ गावी सगदनिधी, पोस्ट- कोराने, थाना-चंद्रमंडी, जिल्हा-जमुई राज्य-बिहार येथे जाउन स्थानिक पोलीस ठाणे चंद्रमंडीच्या मदतीने आरोपीस 24 तासात अटक करून पंचासमक्ष चोरीचा माल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपीकडून रोख रक्कम 8 लाख 46 हजार 500 रूपए, विविध कंपनीची महागडी घड्याळे व कॅमेरे असा एकूण 2 लाख 46 हजार रूपयांचा माल, 35 लाख 91 हजार 048 रूपए किंमतीचे सोने, चांदी व हिर्याचे दागिने असा एकुण 46 लाख 83 हजार 548 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कार्रवाई अपर पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्र, पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर जाधव, पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे, सहा. पोलीस निरीक्षक सोहन कदम, सहा. पोनि हेमंत गिते, पोउनि इंद्रजित भिसे, गुन्हे प्रकटीकरण पथक चे सत्यवान जगदाळे, श्रीकांत तावडे, वाघुलकर, सचिन भालेराव, रवी राउत, सुजन केसरकर, योगेश हिरेमठ, प्रविण वैराळे, दादासाहेब घोडके, संदीप म्हात्रे, चिरंजीव नवलू, रूपाली डाईगडे आदिंनी केली.
हे पण वाचा :-