तिने स्मार्टफोनसाठी केली आत्महत्या!… मूल झालीत पोरकी

चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना घडली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. १७ मार्च: सध्या स्मार्टफोनचे फॅड आहे.  प्रत्येकाकडे काहीही नसो पण स्मार्टफोन असो, अशी इच्छा असतेच.  स्मार्टफोन मिळविण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो परंतु फोन घेण्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर कोणीही आपला जीव देईल अशी कल्पना करता येईल का? नाही.  मात्र चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहित पतीने मोबाईलचा हट्ट पुरवला नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी १६ मार्च रोजी उघडकीस आली आहे.

       लक्ष्मी सुरेश कुम्मरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिला असलेल्या आठ महिन्याच्या व दोन वर्षाच्या दोन्ही मुले मातृत्वापासून पोरके झाले आहेत. चंद्रपूर शहरातील हिमाचल लाईन शास्त्रीनगर परिसरात सुरेश कुम्मरी हे राहतात. ते पेंटिंग चे काम करत असतात. याच कामाच्या भरवश्यावर त्यांची पत्नी लक्ष्मी, आठ महिने आणि दोन वर्षाचा असे दोन मुलांचे पालन पोषण करीत आहेत. त्यांच्या मिळकतीवर संसाराचा गाडा आणि परिवाराचा इच्छा-आकांक्षा पूर्ण करीत आहेत.  

       दरम्यान पत्नी लक्ष्मीने काही दिवसांपासून पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याबाबत हट्ट धरला होता. परंतु सध्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने पत्नीला थांबण्यास सांगितले होते. मात्र ती मोबाईलचा हट्ट बाळगून असल्याने शेवटी दोन दिवस थांबण्यास सांगितले होते. दरम्यान पतीने तिला काल मोबाईल घेऊन देण्यासाठी तयारी केली होती. मोबाईल घेण्यापूर्वीच काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पाती घरी आल्यानंतर घटना त्यांच्या लक्षात आली. लगेच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.  माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.

       दरम्यान पोलिसांनी सदर आत्महत्या बाबत चौकशी सुरू केली असता, धक्कादायक कारण पुढे आले आहे. पतीने आपल्या बयानात मोबाईलसाठी पत्नीचा अट्टहास होता. परंतु मोबाईल घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने वेळेवर घेऊन देता आले नाही. मात्र आज मंगळवारी आपण तिला मोबाईल घेऊन देण्याची व्यवस्था केली होती. आपल्या कामाचे पैसे घेऊन आलो होतो, परंतु त्या अगोदरच तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कबुली पोलिसात दिली आहे.

       विवाहितेच्या पश्चात आठ महिन्याचा तान्हुला आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. मात्र आईच्या चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही बाळ आता मातृत्वापासून पोरके झाले आहे. पत्नीने अनाठाई कारणासाठी अट्टहास करून पती व चिमुकल्यांना सोडून जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Sucide Case