भेंडाळा येथे रविवारी शेकापचा कार्यकर्ता मेळावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चामोर्शी : गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांच्या प्रचार – प्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर – फराडा व भेंडाळा – मुरखळा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भेंडाळा येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ते/ महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या हस्ते या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सहउद्घाटक म्हणून जयश्रीताई जराते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेकापच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहनराव गुंड, अध्यक्ष म्हणून शेकाप आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते उपस्थित राहणार आहे. भाई शामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), डॉ. गुरुदास सेमस्कर (जिल्हा समिती सदस्य), भाई अक्षय कोसनकर (युवा नेते), कविता ठाकरे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी), गुड्डू हुलके (जिल्हाध्यक्ष युवक आघाडी), अभिलाषा मंडोगडे (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी), भाई शोएब पटेल (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी), भाई गोविंदा बाबनवाडे (जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी), भाई पवित्र दास (जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी), भाई प्रभाकर गव्हारे (जिल्हाध्यक्ष महामार्ग बाधित शेतकरी आघाडी), भाई रामदास आलाम (जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी), भाई डंबाजी भोयर (जिल्हाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी), भाई शर्मीश वासनिक (जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी) तर विशेष अतिथी म्हणून दामोधर रोहनकर, क्रिष्णा नैताम, गंगाधर बोमनवार, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, पांडूरंग गव्हारे, सौ. पोर्णिमाताई खेवले, सौ. पोर्णिमाताई शेंडे, सौ. साधनाताई बानबले, सौ. पपीताताई सातपुते, रमेश कोकावार, चिरंजीव पेंदाम, डॉ. भाऊराव चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

विक्रमपूर – फराडा व भेंडाळा – मुरखळा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजु केळझरकर (सगनापूर), अनिमेश बिश्वास, मारोती आगरे (मोहुर्ली), देवराव शेंडे (मोहुर्ली), विजय राऊत (वेलतुर तुकूम), कालिदास पोरटे (वाघोली), भैय्याजी कुनघाडकर (भेंडाळा), प्रकाश पाल (फोकुर्डी), मंगेश येनप्रेड्डीवार (फराडा),सुभाष आकलवार (सगनापूर), खुशाल भगत (घारगाव), सगनापूर शाखा – गजानन देवाजी आभारे (चिटणीस), प्रभाकर रामजी पोरटे (खजीनदार), श्रावण नागोजी भोयर (सहचिटणीस), प्रभाकर देविदास बोलीवार (सहचिटणीस), मोहुर्ली शाखा अनिल नामदेव आगरे (चिटणीस), संजय भोयर (खजिनदार), रेवनाथ गेडकर (सहचिटणीस), कवरदेव मंडोगडे (सहचिटणीस), तुकूम शाखा रमेश माधव यम्पलवार (चिटणीस), दिलीप माधव आभारे (खजिनदार), गजानन पैका तिवाडे (सहचिटणीस), रामदास व्यंकाजी कोहपरे (सहचिटणीस), वाघोली शाखा भोजराज गजानन भोयर (चिटणीस), रोशन मुरलीधर मोंगरकार (खजिनदार), ओमप्रकाश यशवंत पोरेटे (सहचिटणीस), रामचंद्र कान्होजी किरमे (सहचिटणीस), एकोडी शाखा प्रदिप निलकंठ पाल (चिटणीस), दिलीप देविदास चंदनखेडे (खजिनदार), विनोद उध्दव निकुरे (सहचिटणीस), सतिश प्रभाकर पाल (सहचिटणीस), भेंडाळा शाखा हेमंत कुंडेकर, सचिन सातपुते, किशोर सुरजागडे, दामाजी सातपुते, घारगाव शाखा अजय भगत, राजीव मंगर, छत्रपती दुरपळे, अमोल नैताम गुरुदेव बुरांडे (सोनापूर), नागेश मडावी (जामगीरी), रमेश मंडोगडे (रामाळा), नितीन चलाख (खंडाळा), दयाकर येलेटीवार, नरेंद्र पोरटे (दोटकुली) यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment