बुलढाणा येथे शिवजयंती उत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. १९ फेब्रुवारी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  बुलढाणा शहरामध्ये सर्व जाती धर्माचे नागरीक एकत्र येऊन लोकोत्सव म्हणुन साजरी केली. या जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना वेळी झाली. 19 फेब्रुवारीला सकाळी 10.10 मिनिटांनी बुलढाणा शहरातील गांधी भवन येथे पारंपारिक पद्धतीने हा जन्मउत्सव सोहळा  साजरा केल्या गेला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला दुधाचा अभिषेक करून पूजन करण्यात आले. त्यानंतर बाल शिवाजीच्या वेशभुषेतील बाळाला पाळण्यामध्ये टाकुन पाळणागीत सुहासणी गाऊन हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला आहे. तर शौर्य ढोल ताशा पथकाने यावेळी मानवंदना दिली.  तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आ. संजय गायकवाड आणि शिवजयंती सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी आ. विजयराज शिंदे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे पाटील यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते व सर्व जाती धर्माचे लोक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा साजरा करण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या सर्व कार्यक्रमाचे या थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांच्या द्वारे फेसबुक लाईव्ह आणि स्थानिक केबलच्या माध्यमातून केले गेले. यावेळी उपस्थित लोकांनीही सामाजिक अंतर राखून आणि मास्कचा वापर करून या जन्मोत्सव सोहळ्याला आपली उपस्थिती लावली होती.

Shivaji Jayanti Festival