शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या ईडीची सूडबुद्धीनं छापेमारी सुरू आहे. अटक करायची असेल तर अटक करून टाका. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही – शिवसेना खा.संजय राऊत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यावर सूडबुद्धीनं छापेमारी सुरू आहे. अटक करायची असेल तर अटक करून टाका. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. ही नामर्दानगी आहे. थेट समोर येऊन लढा. शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका. हे उद्योग एक दिवस तुमच्यावरच उलटतील-शिवसेना खासदार संजय राऊत..

मुंबई डेस्क २४ नोव्हेंबर:- शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यावर सूडबुद्धीनं छापेमारी सुरू आहे. अटक करायची असेल तर अटक करून टाका. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. ही नामर्दानगी आहे. थेट समोर येऊन लढा. शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका. हे उद्योग एक दिवस तुमच्यावरच उलटतील या कारवाई विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध करुन भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सीबीआय, ईडी काहीही असू द्या, हे सरकार, आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे,” असं राऊत म्हणाले

अंमलबजावणी संचालनालयाची पथकं आज सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली आणि शोधमोहीम सुरु केली. मुंबई, ठाणे परिसरातील दहा ठिकाणी ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई केली जात आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करताना संजय राऊत यांनी भाजपला ‘शिखंडी’ची उपमा दिली आहे. “ईडीने भाजपच्या कार्यालयातच शाखा उघडली असेल. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अटक करायची असेल तर करा, नोटीस कसल्या पाठवता, हिंमत असेल घरी या. सरनाईक घरात नसताना त्यांच्या घरात धाड टाकली आहे ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढावं, शिखंडीसारखं नाही. ईडी किंवा सीबीआयचा वापर करुन, केंद्रीय सत्तेचा वापर करुन लढायचा प्रयत्न करत असेल तर विजय आमचाच आहे,” असं शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.”मानसिक त्रास द्यायचा हे उद्योग तुमच्यावर उलटतील, ती वेळ आली आहे. साम दाम दंड भेदाचं डॉक्टरेट आमच्याकडेही आहे. आमचा जन्मच त्यामधून झाला,” असंही राऊत म्हणाले.

pratap sarnaiksanjay rautUdhhav Thakare