दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव.

जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त यांचे विरुद्ध याचिका.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21, सप्टेंबर :- दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना आणि महानगरपालिकेने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने आता शिवसेनेने न्यायलयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती. अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली.

हे देखील वाचा :-

गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..

bombay high courtshivajiparkshivsena