Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
  • facebook
  • twitter
  • google_plus
  • Email
Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह वादाच्या भोवऱ्यात नवे ट्विस्ट समता पार्टी ने केला दावा.

By Loksparsh Team on October 12, 2022
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 12,ऑक्टोबर :- शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे गटात विभागल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचे कारस्थान दोन्ही गट सोडत नाही आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले. पण या चिन्हाबाबत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

१९९४ साली दिवंगत सुप्रसिद्ध कामगार नेते , माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस आणि बिहारचे विध्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांचे विरुद्ध लढण्यासाठी समता पार्टी स्थापन केली होती. आणि या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देऊन मशाल हे चिन्ह दिले होते. परन्तु आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिल्याने समता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी या चिन्हाला विरोध केला आहे. हे चिन्ह आमचे असून आम्ही अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत आमचा उमेदवार उभा करणार असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाला दुसरे चिन्ह द्यावे अशी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट अडचणीत आला असून निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहचावे म्हणून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने सर्वत्र मशाल पेटवून हे चिन्ह प्रमोट करण्याचा मागील दोन दिवसांपासून जोरदार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केला. परन्तु या नव्या ट्विस्टमुळे पुढे काय होणार? याची चिंता ठाकरे गटाला लागली आहे.

हे देखील वाचा :-

ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले मेळावाचे आयोजन..

mumbaishivsenashivsena new logoudhav thackarey
  • Maharashtra
Share
Related Posts

जिजगावात ‘एक गाव, एक वाचनालय;’गडचिरोली पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

वसईत आठ कोटींचे हेरॉईन जप्त

दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी गडचिरोली पोलिसांची नवी उड्डाण

दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजनाची गरज – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

क्रीडा सुविधावर 13 सप्टेंबरला आढावा बैठक

..अखेर ताटीगुडम येथील खाजगी विहीरीतील गरम पाण्याचा रहस्य उलघडलं

कोनसरीच्या १९ महिला एलएमईएल परिवारात दाखल

  • Home
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
View Desktop Version