जिल्हयात 6 जून रोजी साजरा होणार शिव स्वराज्य दिन

मुख्य कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर राहणार उपस्थित. ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला ग्रामविकास विभागाच्या सूचना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 4 जून : राज्यासह जिल्हयात दि. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी शिव स्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या सूचनांनूसार गडचिरोली येथील जिल्हा परिषदेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे उपस्थित शिवस्वराज्यदिनाचा कार्यक्रम साजरा केला जणार असल्याचे जिल्हा परिषदे मार्फत कळविण्यात आले आहे.

कोविड संसर्गाबाबत आवश्यक काळजी घेवून कमीत कमी उपस्थितीमध्ये जिल्हयातील ग्रामपंचायती, पंचायत समितीमध्ये शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहेत.

दिनांक 6 जून रोजी सकाळी 9.00 वा सर्व ठिकाणी शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात येणार असून यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला जाणार आहे. भगवा स्वराज्यध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा या दिवशी देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे. त्याच दिवशी सुर्यास्ताला राजदंड स्वराज्यगुढी खाली घेण्यात येणार असल्याचे शासनाने नमूद केलेल्या संहितेत सूचना देणेत आल्या आहेत.

शिव स्वराज्य दिन कार्यकमासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली येथील जिल्हा परिषदेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे उपस्थित शिवस्वराज्यदिनाचा कार्यक्रम साजरा केला जणार असून ते दि.5 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि.6 जून रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये शिव स्वराज्य दिन कार्यकम आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

प्रशासनाकडून जिल्हयातील नागरिकांना परिपत्रकाद्वारे कोरोना लसीकरणासाठी आवाहन

कोविड पश्चात मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीबाबत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये

अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

 

gadchiroli districtlead story