नाशिकमध्ये आग लागून शिवशाही बस बेचिराख

सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक, 02 नोव्हेंबर :-  राज्यात शिवशाही बसमधुन प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. कारण गेल्या दोन दिवसात दोन घटनांमध्ये शिवशाही बसला आग लागली आहे. आज नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग लागली तर काल पुण्यात रहदारीच्या ठिकाणी शिवशाही बस ने पेट घेतला होता. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे आॅडिट करण्याची मागणी होत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात आज बुधवार सकाळी शिवशाही बसने अचानक मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांने त्वरीत बस थांबवून आतील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, शिवशाही बस जळून खाक झाली आहे. नाशिकमध्ये बस जळण्याच्या घटनेत होणारी वाढ बघता चिंता व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा :-

busFireShivshahi