धक्कादायक! पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून

पुणे डेस्क, दि. २८ मे :  अवघ्या काही महिन्यात प्रेमविवाह झालेल्या जोडप्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. संतांच्या भूमीतील या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पुजा वैभव लामकाने असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आरोपी वैभव लामकाने याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुजा आणि वैभव यांचा प्रेमविवाह तीन महिन्यांपूर्वी देहूत झाला होता, मात्र पती-पत्नीमध्ये, शाब्दिक वाद होऊ लागल्याने त्याचे पर्यवसान पुजाच्या खुनात तब्दील झाले. मयत पूजा ने वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने रेशमाच्या गाठीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे.

नववधूने रेशीमगाठीच्या बंधनात संसाराची स्वप्ने बघितली होती. मात्र रागावर ताबा ठेवता आला नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून, आरोपीला वडगांव मावळ कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार मूल्यमापन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती