धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून केली हत्या तर पतीची गळफास लावून आत्महत्या

कोडशी खुर्द येथील घटना; चिमुकले झाले पोरके

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरपना, दि. २३ एप्रिल :- पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खू. येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, कोडशी खू. येथील सुनील मधुकर डवरे (३५) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी रॉड ने डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यात अलका सुनिल डवरे (२६) हीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलने स्वतःहून घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आला. मृतक दाम्पत्याला एक मुलगा , एक मुलगी आहे. ते दोन्ही आई – वडीला विना पोरके झाले आहे.

घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.

Sucide Case