लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : वडसा तालुक्यातील चोप कोरेगाव या भागात रब्बी हंगामातील पिकाची पेरणी झाली असून पिकाकरीता लागणारा खताचा साठा जिल्हयात उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे क्विवा शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यात जाऊन खताची खरेदी करावी लागणार आहे.
जिल्हयात रब्बी हंगामात मका व धान तसेच भूईमूग हे परंतु या पिकाला देण्यात येणारा २०. २०.०. १३ हे मिश्र खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, गोंदिया जिल्ह्यातील महागाव, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथून खताची खरेदी करून आणावी लागत आहे. याच महिन्यात मक्याला मिश्र खताची आवश्यकता असते. परंतु खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करून कृषी केंद्रचालक वाढीव दराने खत विक्री करीत आहेत.
आधीच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी विजेच्या समस्येने त्रासून धान पीक सोडून मका या नगदी पिकाकडे वळले आहेत. या वर्षी देसाईगंज तालुक्यात ८० टक्के मक्याचा पेरा झालेला असून नुकतीच लागवड संपली आहे. परंतु शेतकरी खतासाठी वणवण फिरत आहेत. अधिकचा भाव देऊन लगतच्या जिल्ह्यातून खताची खरेदी करून आणात आहे. शासनाकडे खताचा ऑनलाइन स्टाक आहे, परंतु दुकानात स्टॉक नाही ? मुद्दाम भाव वाढ करण्यासाठी तर तुटवडा पाडला जात नाही. अशी शंका व्यक्त होत आहे.
जिल्हयात वडसा रैंक पॉईंटवरून जिल्ह्यात खताचा पुरवठा होत असतो. पण ज्या तालुक्यात रैंक पॉईंट आहे तेथेच खताचा तुटवडा आहे. कागदोपत्री स्टॉक दाखवल्या जात आहे पण, वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
हे ही वाचा,