चंद्रपुरात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर श्रमिक एल्गार संघटनेने केले आंदोलन

मानव- वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध उपायांची अंमलबजावणी करण्याची केली मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर 23, डिसेंबर :-  मानव—वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने मानव विकास परिषदेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज श्रमिक एल्गारच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर मुख्य वनसरंक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.  आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्हयातील जंगलालगत असलेल्या गावात मागील काही महिन्यापासून मोठया प्रमाणावर मानव—वन्यजीव संघर्ष निर्माण झालेला आहे.  यात अनेक माणसे, महिला व मुले यांचेसह हजारोच्या संख्येत जनावरे मारली गेली आहे.  शेतीचे प्रचंड नुकसान होत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

वनविभागाच्या विरोधात स्थानिक नागरीकांत प्रचंड रोष आहे व यातून जंगलालगतच्या गावात वारंवार कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. ही बाब गावकरी व वनविभाग या दोघांच्याही हिताची नाही. प्रश्नाच्या निमित्ताने 15 फेब्रुवारी 2019 रोजी श्रमिक एल्गारच्या पुढाकारातून हळदा येथे ‘मानव हक्क परिषद’ घेण्यात आली. परिषदेत हळदा परिसरातील ३० गावातील ५००० चे वर नागरीक उपस्थित होते. जिल्हयात प्राणीसंग्राहालय तयार करणे, जंगलालगत असलेल्या गावात सशस्त्र वनकर्मचारी नेमण्यात नेमणे, अथवा स्वसरंक्षणासाठी गावात बंदूक देण्यात यावी, गुराख्याची नोंदणी करून, ५० लाखाचा विमा काढणे, नागरीकांचा ५० लाखाचा विमा वनविभागाने काढावे, मागेल त्याला सोलर कुंपण विनाअट देण्यात. असे अनेक ठराव परिषदेत संमत करण्यात आले. या ठरावावर अंमलबजावणी व्हावी अशी आंदोलकांनी मागणी केली.

हे देखील वाचा :-

भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू