लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर विकेंड लॉकडाऊन ला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तर पोलीस विभागाने शहरापासून तर ग्रामीण भागातील चौकाचौकात पोलिस तैनात केले आहेत. ग्रामीण भागासह तुरळक प्रमाणात नागरिकांचे आवागमन सुरु असले तरी महत्त्वाच्या चौकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठा आज बंद पाहायला मिळत आहे.
गडचिरोली, दि. १० एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रसार वेगान वाढू लागल्याने राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन घोषीत केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने शनिवारी अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई पोलीसांकडून सुरु आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज सकाळपासून जिल्ह्याच्या परिस्थितीचा विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.
विकेंड लॉकडाऊनचे पोलीस प्रशासनाकडून काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाभरात सर्वच पोलिस फोर्स ची १२००० पोलीस जवान आणि २०० होमगार्ड, असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अपर पोलीस अधीक्षक, १० उपविभागीय पोलीस अधिकारी तर ५८ पोलीस ठाण्याचे प्रभारी यांसह एकूण ३०० पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी झाले आहेत. जिल्हा बाहेरून प्रवेश करणाऱ्या नाक्यावर बॅरिकेस् लावून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा बाहेरुन येणाऱ्याची माहिती घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा, छत्तीसगड राज्याची सीमा असून याशिवाय जिल्हा बाहेरून येणाऱ्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांनाच प्रवासाला परवानगी दिली जात आहे.