धान खरेदी केंद्र एकच असल्याने शेतकऱ्यामध्ये विक्रीबाबत होत आहेत वाद विवाद!

आरमोरी तालुक्यातील गोदामे फुल्ल

वनपट्टे टोकण धारक शेतकरी धान विक्रीपासून राहणार वंचित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि 10 मार्च:  मार्केटिंग फेडरेशन च्या आधारभूत धान खरेदी केंद्रात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यात न आल्याने लाखो क्विंटल खरेदी केलेले धान गोदामात पूर्णता भरलेली आहेत. संस्थेच्या विविध धान खरेदी केंद्रावर धान खरेदी नियमित सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त गोदमाची व्यवस्था नसल्याने आरमोरीतील एकाच केंद्रावर खरेदी सुरू आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्यांमध्ये धान विक्रीसाठी  वाद विवाद होत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत.

जिल्हाभरातील संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे धान खरेदी केंद्र गोदमे उपलब्ध नसल्याने बंद अवस्थेत असून येत्या काही दिवसात सुरू असलेली अनेक धान खरेदी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील हजारो वनपट्टे मिळालेले शेतकऱ्यासह अन्य शेतकरी धान विक्रीपासून वंचीत राहणार असल्याचे वास्तव समोर येत आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन च्या वतीने जिल्ह्यात खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून डिसेंबर मध्ये खरेदी केंद्र सुरू करून त्या माध्यमातून हमीभावाने जिल्ह्यात धान खरेदी करण्यात येत होती. मात्र मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील एकूण  १८ खरेदी केंद्रावरून आजपर्यंत अंदाजे ४ लाख ६० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी आरमोरी तालुक्यातील आरमोरी, वैरागड, वडधा या तीन खरेदी केंद्रावर आजपर्यंत अंदाजे १ लाख ३० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या गोदामात धानाचा साठा तीन महिन्यापासून उचल न करण्यात आल्याने खरेदी करण्यात आलेला लाखो क्विंटल धान गोदामात पडून आहे.

मार्केटिंग फेडरेशन कडे खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करून ठेवण्यासाठी स्वतःच्या गोदमाची व्यवस्था नाही. त्यामुळे खरेदी केंद्राच्या ठिकाणी गोदाम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी आजपर्यंत खरेदी करण्यात आली. मात्र पुढे खरेदी केंद्र सुरू ठेवण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन कडे गोदमाची व्यवस्था अपुरी पडत आहे. आणि बऱ्याच ठिकाणी गोदाम भाड्याने सुद्धा उपलब्ध होत नसल्याने कित्येक खरेदी केंद्र गोदमाअभावी बंद पडली आहेत. तर ज्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत तेही लवकरच बंद पडणार असल्याने जिल्यातील जवळपास १५ ते २० हजार टोकन धारक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत. खरेदी केलेल्या धानाची उचल जर केली असती तर  धानाची साठवणूक केलेली गोदामे खाली झाली असती आणि खरेदी नियमित सुरू ठेवणे सोईचे झाले असते. परंतु यावर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यास दिरंगाई होत असल्याने गोदमामुळे खरेदी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खरेदी केलेला धान साठवून ठेवण्याची व्यवस्था होणार नसल्याने खरेदी केंद्र बंद पडल्यास टोकण धारक शेतकरी धान कुठे विकणार असा प्रश्न निर्माण झाला असून धानविक्री पासून वंचित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.  त्यामुळे खरेदी करुन गोदामात साठवणूक केलेल्या धानाची तात्काळ शासन प्रशासनाने उचल करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

खरेदी केंद्राची मुदत 31 एप्रिल पर्यंत वाढविण्याची शेतकऱ्याची मागणी

गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेले खरेदी केंद्र चालविण्याची मुदत ३१ मार्च ला संपणार आहे. मुदत संपल्यानंतर खरेदी केंद्र बंद होणार असल्याने जिल्यातील हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने धान खरेदीची मुदत एक महिन्याने म्हणजे ३१ एप्रिल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी मोठी झुंबड आणि भांडणे सुरू

राज्य शासन आधारभूत भावाने खरेदी केलेल्या धानावर प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देणार असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी गर्दी करीत आहेत आरमोरी येथील खरेदी केंद्रावर शंभराहून अधिक धानाचे पोते भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या असून धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर मोठी झुंबड उडाली असून धानाचा काटा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भांडण होताना दिसत आहेत. या धान खरेदी संदर्भात डी एम ओ विश्वनाथ तिवाडे याना विचारणा केली असता, आमच्याकडे शासकीय धान  खरेदी करण्यासाठी गोदाम उपलब्ध नाहीत आणि बरेच आरमोरी आणि जिल्हातील बाकीच्या तालुक्यांतील  जास्त गोदाम उपलब्ध झाल्यास  – आम्ही शेतकऱ्यांचे धान खरेदी तात्काळ करू असे सांगितले.

        बैलबंडी धारक शेतकऱ्यांच्या लागल्या रांगाच  रागा-आरमोरी तालुक्यातील बैलबंदी धारक शेतकरी सुद्धा आपले धान विक्रीसाठी आप आपल्या बैलबंदीने धान विक्रीसाठी ४  दिवसापासून आणले आहेत पण त्यांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत असून खूप दिवसानंतर बैलबंडीच्या शेतकऱ्यांना सुद्धा रोजगार धान वाहतुकीच्या माध्यमातून मिळाला आहे. दररोज जवळ्पास १०० ट्रॅक्टर धान विक्रीसाठी रांगच रांग लावून दिसत आहेत. याची दखल जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने घेऊन जिल्हातील प्रत्येक तालुक्यात धान खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये २५००० क्विंटल क्षमतेची २ गोदाम धान आणि मका खरेदी करण्यासाठी बांधण्यात यावी आणि तालुका स्तरावर ५०००० क्विंटल क्षमतेचे ४ गोदाम बांधण्यात यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी  केली आहे. आरमोरी तालुक्यातील संपूर्ण गोदाम हे धान्य खरेदी पूर्णपणे भरले असल्याने आता जवळपास दीड हजार शेतकरी हे धान विक्री पासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार तसेच जिल्हाधिकारी यांनी गोदाम उपलब्ध न झाल्याने किमान मोकळ्या व खुल्या जागेवर या शेतकऱ्यांचे धान करण्यासाठी खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी. सोबतच हे धान्य खरेदी करतांना धान्याची नासाडी होऊ नये. यासाठी ताडपत्री उपलब्ध करून द्याव्यात ज्या ठिकाणी धान्य खरेदी सुरू झाले आहेत. त्या खरेदी केंद्रावरच्या  धानाची उचल तात्काळ करण्यात यावी अशी मागणीही शेतकरी जनतेकडून होत आहे.

former