रस्त्यातील खड्ड्यात झोपा काढा आंदोलन

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थे कडे प्रशासनाचे दुर्लक्ष :– अभिजित कुडे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वरोरा, 8 मार्च :- वरोरा तालुक्यातील उखर्डां ते नागरी रस्त्यासाठी लक्षवेधी आंदोलन कृषी प्रधान देशात ग्रामीण भागातील समस्यांकडे सरकार व प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या जात नाही. ग्रामीण भागातील जनतेला निवडणुका व निवडणुकीतील आश्वासने यापेक्षा जास्त काहीच सरकारच्या वतीने मिळत नाही. वरोरा तालुक्यातील उखर्डा पाठी ते उखर्डा तसेच उखर्डा ते नागरी या संपुर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे.संपुर्ण रस्त्यावर जीवघेणे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे त्या भागातील खाजगी व सार्वजनीक प्रवासी वाहतूक पूर्णत विस्खडीत आहे. एखादा अपघात झाल्यास आपातकालीन परिस्थीतीत एखादी रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही पण याकडे ना लोकप्रतिनिधि ना सार्वजनीक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष आहे.
या भागातील नागरीकांनी अनेकदा त्या भागातील लोकप्रतिनिधि व प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण रस्त्याची समस्या काही सुटेना. बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन देखील खड्डे बुजविण्यात आले नाही या मुळे आम्ही खड्ड्यात बेसरमची झाडे लावून आंदोलन करण्यात आले. जर 10 दिवसात खड्डे बुजविण्यात आले , अनेकवेळा निवेदन देण्यात आली.नाही तर वरोरा येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार, या जीवघेण्या खड्डया मुळे अनेक अपघात घडत असतात .या खड्ड्यात पडून कुणाला जीवित हानी झाली तर प्रशासन जबाबदार राहणार प्रसिद्धी पत्रक नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना तर्फे आंदोलन नागरी ते माढेली जाण्यासाठी उखर्डा मधून जाणार रस्ता हा सोयीस्कर आहे. तसेच, वेळ वाचवणार देखील आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. हे दिसत असून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचलतांना दिसत नाही.

उखर्डा रस्त्यावरून नागरी ते माढेली रस्ता चांगल्या स्थितीत असल्यास 5 मिनीटात अंतर कापता येते परंतु, आता रस्त्यावर रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे हेच अंतर जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. त्यासोबत दुचाकी – चारचाकी वाहनवरून प्रवास करणाऱ्याना होणारे शारीरिक त्रास व गाड्यांचा वाढणार नाहक खर्च यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. उखर्डा ,नागरी परिसरातील नागरिकांना या, रस्त्यावरून प्रवास करताना होणार त्रास लक्षात घेऊन व तसेच, काही नागरिकांनी सदरचा रस्ता व्यवस्थित करण्यात यावा याकरिता अनेक वेळा निवेदन देण्यात आले, आंदोलन करण्यात आले. यासाठी अभिजित कुडे सतत पाठपुरावा करत होते त्या नंतर रस्त्याचे काम मंजूर झाले असे अधिकारी सांगतात मात्र अजून देखील कामाला सुरुवात झाली नाहीं.पावसाळ्याच्या आधी रस्त्याचे काम करावे अशी विनंती करण्यात आली तरी देखील प्रशासन झोपा काढत आहे त्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले तात्काळ रस्त्याचे काम सुरू केले नाही तर लोकांच्या रोषाला कारणीभुत प्रशासन असेल . यांच्याकडे मागणी केली या संदर्भात उखर्डा रस्त्यावर नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना चे माध्यमातून मुर्दाड सत्ताधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

यावेळी, अभिजित कुडे यांनी सत्ताधिकाऱ्यांवर निशाणा साधत जर, सदरचा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित केला नाही तर, पुढील आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा अभिजित कुडे दिला. भविष्यात रस्त्यावरील खड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होऊ नये तसेच, जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या नेत्यांना इशारा देत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलना यावेळी नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना अध्यक्ष अभिजित कुडे, उपाध्यक्ष शुभम हीवरकर,रोशन भोयर, अनिकेत राऊत, तेजस उरकुडे,विनोद कोठारे, तेजस उरकुडे, रंजीत कुडे, विजय कुडे, उपस्थित होते.

हे पण वाचा :-