साॅफ्टवेअर इंजिनिअर आदिवासी महिला वर सामुहिक बलात्कार

10 जणांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

झारखंड, 22 ऑक्टोबर :- झारखंडमध्ये एका साॅफ्टवेअर इंजिनिअर महिला वर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. पिडीत महिला ही आदिवासी समाजातील आहे. ही घटना गुरूवार संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली असून रात्री उशिरा पोलिसांना याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेत 10 आरोपींचा समावेश असल्याचे कळत असून हे सगळे आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पिडीतेने सांगितले आहे कि, 20 ऑक्टोबरला सायंकाळी ती तिच्या एका मित्रासोबत रस्त्याच्या कडेला उभी राहुन बोलत होती. यावेळी 8-10 जण तिथे आले आणि त्यांनी या दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पिडीतेला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केली. पिडीत तरूणीला रूग्णालयात दाखल केले असून तिला कोणालाही भेटायची परवानगी नाही. पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले कि, संशयाच्या आधारे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चैकशी सुरू आहे.

हे पण वाचा :-

अपहरण व मारहाण प्रकरणी आव्हाडांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

बिबट्याने हल्ला करून घेतला तरुणीच्या नरडीचा घोट

gang-rapedtribal woman