जालन्यातील जवान नाईक सुभेदार गणेश कर्तव्यावर असताना निधन

विजय साळी जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथील रहिवासी शहीद जवान नाईक सुभेदार गणेश श्रीराम फदाट कर्तव्य बजावत असतांना हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. जवानांचं नाव असून ते सिकंदराबाद येथील भारतीय सैन्य दलाच्या एओसी केंद्रात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. सिकंदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज बोरगाव फदाट या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.गणेश फदाट यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,आई ,वडील,भाऊ,बहिण असा मोठा परीवार आहे.

जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव बु येथील शहीद जवान नाईक सुभेदार गणेश श्रीराम फदाट वय (४३) हे अनंतात विलीन झाले. शुक्रवारी (दि.२२) दुपारी १ वाजता बोरगांव बु येथील मोकळ्या प्रगणांत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. फदाट यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह जिल्हाभरातून हजारो नागरिक बोरगाव बु. येथे दाखल झाले होते यामुळे आजूबाजूच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. सैन्यदलातील सुभेदार बाळासाहेब बोरकर, विरपिता श्रीराम फदाट, विरमाता फदाट, विरपत्नी अंजली फदाट, विरपुञ प्रेम फदाट, सैन्यदलात कार्यरत असलेले दिनेश फदाट, तहसीलदार सतीश सोनी, जिप अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, सपोनी अभिजीत मोरे, माजी सैनीक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक मुठ्ठे यांच्यासह मान्यवरांनी त्यांना पुष्पचर्क अर्पण केले.

यावेळी गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेले तरुण ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘अमर रहे… अमर रहे… शहीद जवान अमर रहे’, अशा घोषणा देत होते. आज (दि.२२) सकाळी १२ वाजता त्यांचे पार्थिव मूळगावी बोरगाव बु येथे दाखल झाले होते. गणेश फदाट यांच्या राहत्या घरापासून संपुर्ण बोरगांव बु गावातुन मिरवणुक काढण्यात येवुन त्यांचे पार्थिव मारोती मंदीरा समोर आंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लष्कराचे अधिकारी, जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

गावात ठिकठिकाणी गणेश फदाट यांना आदरांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. अत्यंविधिवेळी तालुक्यातील राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, कृषी, सैन्यदल, महसुल, पोलीस यासह विविध क्षेञातील अनेक मान्यवर उपस्थीत होते. तालुक्यातील ठिकठिकाणी चौकाचौकात फाट्यावार शहीद गणेश फदाट यांच्या अंतीम दर्शनासाठी तरुण व ग्रामस्थ थांबलेले होते. शहीद नाईक सुभेदार गणेश फदाट यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्यामागे आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा मोठा फदाट परिवार आहे. त्यांचे लहान भाऊ दिनेश फदाट हे देखील सैन्यदलात कार्यरत असुन यावेळी बोरगांव परीसरातील तसेच तालुक्यातील नागरीक उपस्थीत होते.

solger