जालना जिल्ह्यातील जवानाचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन!

विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, २२ डिसेंबर: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील जवानाचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ३८ वर्षीय गणेश गावंडे असं या जवानाचं नाव असून सध्या ते पुणे येथे सेवा बजावत होते. सेवेदरम्यान ह्रदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांचं निधन झालंय. या घटनेमुळे भिवपूर गावासह परीसरात शोककळा पसरली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते भारतीय सैन्य दलात मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते.

अवघ्या ४ दिवसांपूर्वीच त्यांची बदली पुणे येथील मराठा बटालियन रेस कोर्स मध्ये झाली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना ह्रदय विकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुलं आणि भाऊ असा मोठा परीवार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांचं गाव भिवपूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार केले जाणार आहे.