लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली:-गडचिरोलीच्या विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके (वय- 34 वर्ष) यांचा काल हृदयविकाराने निधन झालं. कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ भामरागड इथल्या ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपास केल्यानंतर मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात सांगण्यात आलं आहे. आज गडचिरोली इथं त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
जवान रवीश मधुमाटके गडचिरोली जिल्ह्यात गोकुल नगर इथले रहिवासी असून 2011 च्या बॅचमध्ये पोलीस विभागात रुजू झाले होते.
परिवारात कोसळले दुःखाचे सावट
मृत्यू जवान गडचिरोली येथील गोकुलनगर येथील रहिवासी आहेत.डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले असून पत्नीसह तीन वर्षाची चिमुकली कन्या, बहीण तसेच आप्त परिवार आहे.परिवारातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुंटूबावर मोठी संकट निर्माण झाले असून गोकुळ नगरात वाऱ्यासारखी बातमी पसरतात सर्वत्र शोक व्यक्त करीत आहेत.