मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जलद विकासासाठी करणार विशेष उपाययोजना

मंत्रिमंडळात निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20,ऑक्टोबर :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांबाबत मोठे निर्णय घेतले गेले. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जलद विकासाच्या दृष्टी ने विशेष उपाययोजना करण्यात येणार असून शेतीपुरक व्यवसाय, रोजगार निर्मिती कार्यक्रम, शैक्षणिक सुविधा निर्मितीचा 2018 चा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासह औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातील 14 जिल्ह्यांत प्रत्येकी 200 प्रमाणे 2800 बचतगटांची निर्मिती करण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडल या बचत गटांची निर्मिती करणार आहे. नांदेड, वाशीम, परभणी, औरंगाबाद, नागपूर या 5 शहरात अल्पसंख्यांक समाजातील बचत गटांतील 1500 महिलांना कौशल्य प्रशिक्षणासं मंजूरी देण्यात आली आहे. या विशेष उपाययोजनासांठी 18.58 कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

नियोजन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, परिवहन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, गृह विभाग, वित विभाग आणि जलसंपदा विभागाकडील मोठे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य सरकारचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड च्या भरती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने नुकतीच 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. या पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी आयबीपीएस आणि टीसीएस कडे देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :-

cabinetdecisionmumbai