वेदना व्यवस्थापन व पोटविकार ओपीडीला उस्फुर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली असून ०५ ऑक्टोबर २०२४  रोज शनिवारला सर्च रुग्णालयात वेदना व्यवस्थापन ओपीडी घेण्यात आली.  डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम यांनी एकूण ५७ रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच १७ रुग्णांना पेन ब्लॉकचे इंजेक्शन देण्यात आले.
पाठीचा कणा दुखणे, पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना, कर्करोग आजारांमुळे होणार्‍या तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेदना व्यवस्थापन ओपीडीचा लाभ घेतला.
पोटविकार ओपीडी मध्ये पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल, मळमळणे, आतड्या मधील सुज, पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज,पोटात पाणी होणे अशी लक्षणे असलेल्या ४४ रुग्णांनी पोटविकार ओपीडी मध्ये तपासणी सुविधेचा लाभ घेतला.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुगांना पेन ब्लॉक ची मोफत सुविधा देण्यात आली. प्रयोगशाळा तपासणी व औषधी मध्ये ५०% सवलत देण्यात आली. वेदना व्यवस्थापन ओपीडी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारला नियोजित असून जास्तीत जात रुग्णांनी या विशेषज्ञ ओपीडीच लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे.
Comments (0)
Add Comment