खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मिळते मदत

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, तरूण क्रिकेट क्लब गांधीनगर येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुलचेरा, 27 ऑक्टोबर :- खेळाने माणुस स्वत:ची प्रगती करू शकतो, आपले भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचे नाव उंचावर नेउ शकतो. खेळ खेळल्याने शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. या क्षेत्रातील युवावर्गाला क्रिकेट, फुटबाॅल, कबड्डी सारख्या खेळासाठी प्रोत्साहन दिल्या जाते असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथ अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ते मुलचेरा तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या गांधीनगर येथे तरूण क्रिकेट क्लब द्वारा आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी त्यांनी विजयनगर, लक्ष्मीपुरी, गांधीनगर येथील काली मातेचे दर्शन घेउन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते कुमार अवधेशबाबा, प्रविणराव बाबा, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, माजी पंस सदस्य सुभाष गणपती, ग्रापं सदस्य बादल शाह, कालीनगर सरपंच पावन मंडल, बंगाली आघाडी महामंत्री बिधन वैद्य, पोलीस पाटील नागेन सेन, महामंत्री निखिल हलदार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, सनातन सरकार, प्रदीप राॅय, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, मंचरलावार, नगरसेवक दिलीप आत्राम, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, उमेश सरकार, अक्षय खिराटकर सह गांधीनगर येथील ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हे पण वाचा :-

 

AtramRaje Ambrishrao