लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धुंडेशिवणी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड करतात मात्र त्यांची मार्केटिंग फेडरेशन कडे नोंदणी न झाल्याने व येथे खरेदी केंद्र नसल्याने त्यांची अडचण होत असून त्यांना इतरत्र मका विक्रीसाठी न्यावे लागत आहे.
या बाबींची दखल घेऊन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह खा. अशोक नेते यांची भेट घेतली व मका खरेदी बाबत चर्चा करून धुंडेशिवणी येथे मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मागणी खा. अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
यावेळी खा. अशोक नेते यांनी मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी यांना निर्देश देऊन शेतकऱ्यांची नोंदणी व मका खरेदी करण्यास सांगितले. तसेच लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे मका खरेदी करण्याचे निर्देश दिले.
यावेळी शिष्टमंडळात जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांच्यासह शेतकरी डोमा रंधये, खुशाल निकुरे, मारोती रंधये, कालिदास मुळे, पांडुरंग मुरतेली, मदनपाल धारने, सुधाकर गेडाम, रामदास चूधरी, प्रभाकर ननावारे, वामन कोलते व अन्य शेतकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
चक्रीवादळाने एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळल्यानं रेल्वेसेवा ठप्प
खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती