गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : नव्यानेच वसलेल्या शिवनगर येथील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी येथे अंगणवाडी सुरु करने हा राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच सेवाकार्य हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. असे मत विश्व हिंदू परिषदेचे गडचिरोली जिल्हा संयोजक रामयन खटी यांनी यानी व्यक्त केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राज्यभीषेक सोहळा कार्यक्रम स्मृती निमित्त राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्था, गडचिरोली च्या अध्यक्षा रेखाताई डोळस यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात उदघाटक म्हणून रामायण खटी उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM, महाराष्ट्र प्रदेश होते. मार्गदर्शक व संयोजक म्हणून रेखाताई डोळस, प्रदेश सदस्य, भाजपा महिला आघाडी, महाराष्ट्र प्रदेश उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश डोळस, सलीमभाई शेख, शहर महामंत्री, अल्पसंख्याक आघाडी, पुष्पाताई करकाडे, भाजपा महिला आघाडी, वच्छलाताई मुनघाटे, जेष्ठ नेत्या, रुक्साना पठाण, कुरेशी मँडम, मधु कौर, शेखताई, पिंटु केवटकर, गीता कोडाप, सुजीत सरकार, नितेश खडसे, कल्पना टेकाम, शोभा कोलते, हर्षे मँडम, कावडेताई, वाळके, रामटेके आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा  :

गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन

SBI ग्राहकांना बँकेत आता फक्त ‘ही’ चार कामं करता येणार

 

lead storyramayan khati