एसटी दिवाळी सणातील एसटी महामंडळ हंगामी दरवाढ रद्द .सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा

दिवाळी सुट्टीमध्ये दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात वाढ करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे दिवाळीला गावाकडे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई: दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने मोठा दिलासा दिला आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळानं ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

diwali st travelgo to homeprice down