‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर शुक्रवार दि. ७ जानेवारी, शनिवार दि. ८ जानेवारी आणि सोमवार  दि. १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका माधुरी कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर  कोरोनापासून बचावाच्या उपाययोजना, कोरोना होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, १५ ते १८ वर्षांच्या तरुणांचे लसीकरण, ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरीएंट, राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती आदी विषयांची माहिती डॉ. आवटे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

हे देखील वाचा : 

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड

 

 

lead news