लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
आलापल्ली, 20 सप्टेंबर : आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र याच्या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच उत्तम व्यासपीठ देण्यात कार्यरत आहे. या संस्थेने पंचायत समिती अहेरी येथील सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक आणि कलावंत म्हणून सर्वांना परिचित असलेले व उपक्रमशील शिक्षक
विजय उद्धवराव दुर्गे यांना या वर्षीचा गुरू गौरव पुरस्कार जाहीर झाला . पुरस्कारांचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजय दुर्गे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शैक्षणिक कार्य करताना शालेय विद्यार्थ्यांना अनेक कलात्मक उपक्रम राबविले. विद्यार्थीच्या सुप्त कलागुणांना चालना दिली. व विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण करून राज्य पातळीवर जिल्हा पातळीवरील चित्रकला परीक्षा व स्पर्धा ना बसविले महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या एलीमेंटरी व इंटरमिजिएट. शासकीय चित्रकला परीक्षेला विद्यार्थ्यांना बसविले.
विजय दुर्गे यांच्या मानवाच्या विविध हालचाली या रेखाचित्रांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना कलेचा आस्वाद घेता यावा यासाठी अनेक वर्तमानपत्रांत कला विषयावर आधारित शैक्षणिक सदर चालविले. अनेक मासिका मधील कथा चित्राची रेखाटन केलीत . हस्तलिखितांचे मुखपृष्ठ, शैक्षणिक चार्ट ची चित्रनिर्मिती केली.
यांचा कलेच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने कला संचालक पांचाळ सर यांनी गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित केले. यापुर्वीही विजय दुर्गे यांनी जलरंगात साकारलेल्या कलाकृतींना राष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक पुरस्कार मिळालेला आहे. शासनाने जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा हरहुन्नरी कलावंतांचे परिसरात व सर्वत्र कौतुक केल्या जात आहे .