लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. ३० मार्च: सहकार नगर जनता वसाहत इथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि जीवघेणा हल्ला प्रकरणी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माननीय माधुरीताई मिसाळ, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा माननीय उमाताई खापरे, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव माननीय वर्षाताई डहाळे आणि पर्वती महिला आघाडी अध्यक्षा विनया बहुलीकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले . आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करून पीडितेला न्याय द्यावा असे निवेदन दिले.
हे निवेदन पोलीस निरीक्षक माननीय कृष्णाजी इंदलकर यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक आनंदजी रिठे, नगरसेवक महेशजी वाबळे, पर्वती चे संघटन सरचिटणीस प्रशांतजी दिवेकर, पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस आशाताई बिबवे, रेशमाताई सय्यद, गायत्रीताई भागवत, पर्वती महिला आघाडीच्या संध्याताई नांदे, सारिका ठाकर, रेणुका पाठक, जान्हवी देशपांडें, साधना काळे, रुपाली महामुनी या पदाधिकारी उपस्थित होत्या .