दक्षिण आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानवाहतुक बंद करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

नव्या कोरोना व्हेरींइंटच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानवाहतुक बंद करा - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी. 
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : कोरोनाचा नवा व्हेरीयंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून आपल्या देशात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही.मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केल्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे दिली.सध्या विमान तळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मॉनीटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हेरीयंट पासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.विमान प्रवासासाठी ७२ तास आधीचे कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं असून विमानतळावर कडक तपासणी केलं जातं असून कवारंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे.दक्षीण आफ्रिकेतुन येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलेले असून केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

शाळा सुरू करण्याबाबत उद्या कॉन्फरन्स मिटिंग, या बैठकीत शाळा सुरू ठेवण्याबाबत पुनर्विचार करू. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

१ डिसेंम्बर पासून राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता मात्र त्याबाबत उद्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यासह ईतर विभागाच्या अधिकाऱ्यानची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार आहे त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही टोपे म्हणाले.
मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास सर्वांना खुला करण्याबाबत देखील टोपे यांनी महत्वाचं विधान केले असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले.राज्यात लसीकरण वेगाने सुरु असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाईन असून ती सुरू करण्याबाबत लोकांना अपेक्षा असते पण त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आपण आहोत. मुंबईत आता मुश्किलने रोज फक्त दोन एकशे रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर जवळपास १०० टक्के लसीकरण देखील झालेलं आहे. तरी यासर्व निकषांच्या अनुषणगाने मुख्यमंत्र्यांना टास्क फोर्स आणि आमच्या आरोग्य विभागाच्या उपलब्ध माहितीवरून योग्य ते निर्णय घेतले जातील असेही टोपे म्हणाले.

हे देखील वाचा :

आश्चर्यकारक! एका महिलेन नवऱ्याला घटस्फोट देत कुत्र्याशी केल लग्न…

धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

 

lead newsRajesh Tope