वडसा रेल्वे स्थानकावर सुपर गाड्यांचा थांबा द्या – ३७७ अधीन सूचनेनुसार खा. अशोक नेते यांची संसदेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात वडसा येथे एकमेव रेल्वे स्थानक आहे. व येथून अनेक रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. मात्र वडसा येथे सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते त्यांना नागपूर अथवा गोंदिया येथे जाऊन समोरचा प्रवास करावा लागतो.

याकडे सरकारने लक्ष देऊन वडसा येथे सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज दि. २९ जुलै रोजी ३७७ अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली.

संसदेत निवेदन करतांना खा. अशोक नेते यांनी सांगितले की, लोकसभा क्षेत्रातील नागरिकांची गेल्या २-३ वर्षापासूनची वडसा येथे सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा ७२० किमी दूर पसरलेला अतिमागास, आदिवासी बहुल, जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्थानक वडसा येथे असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र या ठिकाणी कोणत्याही सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने नागरिकांची अडचण होते. प्रवाश्यांची गरज लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या एकमेव रेल्वे स्थानकावर सर्व सुपर गाड्यांचा थांबा देण्याची मागणी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत केली.

गडचिरोली-आलापल्ली-सिरोंचा-मंचेरियाल तथा उमरेड-भिसी-चिमूर-वरोरा या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षण साठी मंजुरी प्रदान करून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खासदार अशोक नेते यांनी ३७७ अधीन सूचनेनुसार संसदेत केली व या महत्वाच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

हे देखील वाचा :

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

 

 

 

ashok netelead storyWadsa Station