ब्रेकिंग: तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटना संपावर ठाम

तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्या निवेदनाची महसूल विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप 

२२ मार्च पासून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा

मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्या निवेदनाची महसूल विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. अधिवेशन संपताच बैठक न घेतल्यास २२ मार्च पासून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने दिला आहे.

यासंदर्भातील पत्र शासनाला दिले असून प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, दीड महिना उलटून गेल्यावरही संघटनेच्या निवेदनाची दखल न घेता महसूल विभागाने वेळ काढू पणा केल्याचा असल्याचा आरोप तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेकडून केला जात आहे. त्यामुळे तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने महसूल विभागावर नाराजीचा सूर आवळला आहे. दरम्यान शासनाने तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे निर्णय लवकरात लवकरात द्यावा, अशी मागणी यावेळी तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली.