लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमित शहा यांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केकेल्या अपमान जनक वक्तव्याचा तसेच परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू तसेच बीड येथिल सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी निषेध करत अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून कमी करण्यासाठी चौकातून मोर्चा काढून तहसीलदाराला निवेदन देत निषेध..
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू. बीड येथिल सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि अमित शहांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत अपमानजनक वक्तव्याचा निषेध करत आज दक्षिण गडचिरोलीतील आल्लापल्ली येथे हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय दलाच्यावतीने संघमित्रा बौद्ध विहारा पासून मोर्चा काढून आल्लापल्ली चौकातील वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करून काडी फीत बांधून अमित शहा यांच्या विरुद्ध नारेबादी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून कमी करण्यात यावे. परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना, प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्च्यात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी मुख्य चौकात निषेध व्यक्त करत अहेरी येथील तहसीलदार सोमवंशी यांना निवेदन देण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने पदावरून पायउतार करावे महाराष्ट्रात आरोपींचे लागेबंधे असलेल्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर खून केल्याची गुन्हे दाखल करावे या मागण्यासह गडचिरोलीतील आलापल्ली येथे सर्व राजकिय पक्ष तसेच संविधान बचाव संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पासून मोर्चा, रॅलीचे आयोजन करून वीर बाबुराव चौक आल्लापल्ली येथे निषेध व्यक्त करण्यात आला. अमित शहा यांना गृहमंत्री पदावर कमी करण्याची मागणी करण्यासंदर्भात नारे लावून आल्लापल्ली शहर हादरवून टाकण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला..
हे ही वाचा,
सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !
आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन