आनंद विद्यालय बेंबाळ येथिल विद्यार्थ्यांचा तब्बल चोवीस वर्षांनंतर स्नेहभेट मेळावा

स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना मिळाला परत उजाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बेंबाळ:- आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळ मुल तालुक्यातील जुनी शाळा आहे. या विद्यालयाने असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले. याच विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल चोवीस वर्षानंतर एकत्र येऊन आपल्या शालेय जीवनातील आठवणींना परत एकदा उजाळा दिला. सदर कार्यक्रमात एकंदरीत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन यांचा सन्मान करून सत्कार केला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य व्ही. पी. कुंभारे सर होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती प्रा.डि.जे.टिपले सर,प्रा.जे.ओ.भडके सर,प्रा.एम.ए.कोसे सर,प्रा.बि.डी.ठिकरे सर,प्रा.के.आर.मनवर सर या सर्व गुरुजनांची प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

अतिशय उत्साहात व आनंदात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विशाल आरेकर सर यांनी केले तर प्रास्ताविक मदनकुमार उराडे यांनी केले. स्नेहसंमेलन कार्यक्रम घडवण्याचा आणि सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित जोडण्याचे काम नितीन कुंभारे या माजी विद्यार्थ्यांनी केले. शाळेतील उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले व कार्यक्रम स्मरणात राहील असा घडवून आणला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंथादेवी झाडे यांनी केले.