लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. येथील सक्षम आय.ए.एस. अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी ही भावना व्यक्त केली.
अकॅडमीमध्ये झालेल्या या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध अडचणी व शैक्षणिक अडथळ्यांविषयी मंत्री महोदयांसमोर मोकळेपणाने मांडणी केली. यामध्ये अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, पुस्तके, इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच मार्गदर्शनाच्या अभावाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.
या सर्व बाबी गांभीर्याने ऐकत अॅड. जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की, “आपल्या प्रत्येक अडचणी शासनदरबारी नेऊन त्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येतील. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन सक्षम आय.ए.एस. अकॅडमीचे समन्वयक यांनी केले.
गडचिरोलीतील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम अकॅडमी ठरत आहे आशेचा किरण, आणि सरकारची मदत अधिक बळ देणारी ठरेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.