पोलीस उपनिरीक्षकाचा विवाहित महिला शिपायावर विवाहाचे प्रलोभन दाखवत केला बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ०३ डिसेंबर:- पोलीस निरीक्षकाने विवाह करण्याचे प्रलोभन दाखवत विवाहित महिला पोलीस शिपायावर बलात्कार केला आहे .याशिवाय कर्ज फेडण्यासाठी पाच लाख आणि घर बांधण्यासाठी दहा तोळे घेऊन फसवणूक केली आहे. रहीम बशीर चौधरी (30) नेमणूक नांदेड कंट्रोल रा. शिवखेड जिल्हा लातूर असे गुन्हा करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रहीम पुण्यात नियुक्तीला असताना त्याने शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील एका महिला शिपायाशी ओळख वाढवली त्यांनतर त्यांनी लग्नाचे प्रलोभन दाखवले .त्यावेळी महिला शिपाई यांनी लग्न झाल्याचे सांगितले. तरीही आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवून प्रेम संबंध निर्माण करुन त्यांच्याशी साखरपुडा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये घेतले तसेच घर बांधण्यासाठी दहा तोळे सोने घेतले आणि त्यानंतर लग्नास नकार दिला .पोलीस शिपायाला शिविगाड करीत हात-पाय बांधून उचलून नेण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकरणी शिवाजीनगर येथे तक्रार असून  पोलीस अधिक तपास करीत आहेत.