संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बीड: बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला आज केज न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुदर्शन घुलेला आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी केज न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज सीआयडी कोठडी संपल्यानंतर घुलेला न्यायालयात हजर करण्यात आलं. जिल्हा आणि सत्र न्यायालयातले आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी तर सरकारच्या वतीनं वकील जे बी शिंदे यांनी युक्ती वाद केला. यानंतरच केज न्यायालयानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुदर्शन घुलेवर अवादा पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरमी सुदर्शन घुले याला ६ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना दोन वेळा त्याला पोलीस कोठडी देण्यात आली.

यामध्ये सुदर्शन घुलेचं आवाजाचा नमुना देखील घेण्यात आला होता. याचं कारण म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी ज्या फोनवरून कॉल केले, त्यामध्ये सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीतून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांनी सुदर्शन घुलेचे आवाजाचे नमूने न्यायालयात सादर केल्याने पुन्हा सुदर्शन घुलेला कोठडी देण्यात आली.