भाजप-आरएसएस हिटलरशाहीचे पुरस्कर्ते – एड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २२ डिसेंबर: भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक यांची वैचारिक दिशा हिटलरशाहीवादी आहे. मागील २६ दिवसांपासून कडक्याच्या थंडीत शेतकरी रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. परंतु मोदी सरकारने आम्ही केलेले कायदे तुम्हाला मान्यच करावे, अशी हिटलरशाहीची भूमिका असल्याचे सिद्ध केले. तिन्ही कायद्याला स्थगिती दिल्यास भाजप सरकारचे नुकसान होणार नाही. मात्र झुकायचे नाही, हा मोदीसरकारने निर्णय पक्का केला. शेतकरी आंदोलनात असंघटीत कामगार वर्ग उतरल्यास मोदीसरकारला झुकण्याशिवाय पयार्य राहणार नाही, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर नागपुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्याबाबत असंवेदनशील आहेत. केंद्राने पारित केलेल्या तिन्ही बिलांमुळे यापुढे शेतकरी अन्नधान्य खरेदी करणार नाही, हे स्पष्ट झाले. यामुळे देशासमोर अन्न सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकणार आहे. केंद्राच्या निरीक्षणानुसार देशातील ३५ टक्के जनता दारिद्रय रेषेखाली आहे. यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर देशात अराजकता माजेल असे भाकितही यावेळी ?ड. आंबेडकर यांनी यावेळी केले. पंजाबमध्ये मंडी कायदा आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांचा माल याच मंडित आधारभूत किमंतीमध्ये विकला जातो, याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच आधारभुत किमंतीत शेतकऱ्यांचा माल विकला जाईल असा कायदा करून शेतकऱ्यांप्रती प्रामाणिकता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले.