सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

१२ आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 28 सप्टेंबर :-  एकीकडे सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित १६ आमदारांच्या अपात्रते विषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने शिंदे- फडणवीस सरकारने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या १२ नामनिर्देशीत आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती देवून शिंदे -फडणवीस सरकारला दणका दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असून पुढची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कोणाची व पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगास मोकळीक दिली. हा निर्णय शिंदे गटाला दिलासादायक तर ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

मात्र आणखी एका याचिकेत सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला झटका दिला आहे. न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत राज्यात राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांसंबंधी कोणतीही प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला झटका दिला आहे. न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत राज्यात राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांसंबंधी कोणतीही प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

हे पण वाचा :-

सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर, संतप्त जमावाने ट्रक जाळले.

 

16 mla issueCM eknath shindedevndra fadnvis