संप करणाऱ्या एस. टी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा, राज्यातील तब्बल ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई… 

एस. टी कर्मचाऱ्यांची संपाची तीव्रता वाढत असतांनाच कारवाईचा बडगा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही.

अखेर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे. या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे.

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. अशातच आता एसटी महामंडळानेही कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता राज्य शासनाने सरकारने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

खालील प्रमाणे आहे निलंबित आगारांची माहिती…

नाशिक- कळवण-१७
वर्धा – वर्धा ,हिंगणघाट-४०
गडचिरोली- अहेरी,ब्रम्हपुरी,गडचिरोली- १४
लातूर- औसा, उदगीर, निलंगा,अहमदपूर, लातूर – ३१
नांदेड-किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड,हादगाव,मुखेड,बिलोली, देगलूर – ५८
भंडारा- तुमसर,तिरोडा, गोंदिया – ३०
सोलापूर – अक्कलकोट- २
यवतमाळ -पांढरकवडा, राळेगण , यवतमाळ – ५७
औरंगाबाद – औरंगाबाद १ – ५
परभणी – हिंगोली, गंगाखेड- १०
जालना -आफ्रबाद, अंबड -१६
नागपूर – गणेशपेठ, घाटरोड,इमाम वाडा, वर्धमान नगर- १८
जळगाव- अमळनेर-४
धुळे -धुळे -२
सांगली – जत ,पलूस, इस्लामपूर, आटपाडी
एकूण- ३७६

हे देखील वाचा :

राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील लालपरीच्या १४ कर्मचाऱ्यांचं निलंबन

मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

 

Anil Parablead newsMSRTC