स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्या – एसपी गोयल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 20,ऑक्टोबर :-  पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गरजु युवक-युवतींना दिलेल्या जाणार्या स्वयंरोजगारच्या उपलब्ध संधीचा लाभ घेउन प्रशिक्षणार्थी आपली आर्थीक उन्नती साध्य करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.  गडचिरोली पोलीस दल व बीओआय आरसेटी गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्यूटीपार्लर व फोटोग्राफी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

या स्वयंरोजगार प्रशिक्षण निरोप समारंभ कार्यक्रमाला बीओआय आरसेटी अंतर्गत ब्यूटीपार्लर 35, फोटोग्राफी 35 असे एकुण 70 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ब्यूटीपार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1 ब्यूटीपार्लर चेअर वाटप करण्यात आले तसेच फोटोग्राफी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या इच्छूक उमेदवारांची मुलाखात घेवून नोकरीची संधी उपलग्ध करून दिली जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणाथ्र्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, बीओआय आरसेटीचे संचालक चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, कार्यक्रम समन्वयक पुरूषोत्तम कुनघाडकर, महिला ट्रेनर संध्या कोतकोंडावार उपस्थित होते.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन 3554 युवक युवतींना स्वयंरोलगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यक्राच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :-

dadalorakhidkipolice