लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी: पत्रकारिता व पत्रकार यांच्या वरील समाजाची विश्वासाहर्ता कमी होण्याच्या ओघात मात्र तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वात तालुका पत्रकार संघटनेने चींचगुंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत केंद्रातील 11 शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक, पेन व कंपाचे वाटप करून पत्रकार समाजाचा आरसा असल्याचे सामाजिक कार्यातून दाखविले .
त्यामुळे 431 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्यामुळे हास्य फुलले.
तालुका पत्रकार संघटनेने यापूर्वी तालुक्यातील पेरमिली व देवलमारी केंद्रातील 19 शाळेतील 912 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील 1 हजार 868 विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण, भगवंतराव आश्रम शाळा काटेपल्लीतील 320 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, इंदिरा गांधी बलिका विद्यालयात विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वितरण, राजाराम व ताटिगुडम येथील नऊशे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अशा अनेक प्रकारची कामे करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे काम तालुका पत्रकार संघटनेने केले.
कार्यक्रमाला उपस्थित तालुका पत्रकार संघटनेचे सल्लागार सदाशिव माकडे सचिव रमेश बामनकर, व्यंकटेश चालूरकर, उमेश पेंड्याला अनिल गुरनुले, श्रीधर दुग्गीरालापाटी, दीपक चूनारकर, संजय गज्जलवार, गणेश शिंगरेड्डीवार संतोष बोम्मावार, मोहसीन खान व इतर पत्रकार बंधू उपस्थित होते. यासह लांकाचेन व काटेपल्ली येथील मुलींना दोन सायकलचे वितरण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे, संचालन सचिव रमेश बामनकर तर आभार उमेश पेंड्याला यांनी मांडले.
सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून अहेरी येथील केंद्रप्रमुख विनोद पुसलवार , सरपंच कमलाबाई आत्राम, उपसरपंचा सुशीला कस्तुरवार, ग्रामपंचायत सदस्य राजू आत्राम, रामण्णा कस्तुरवार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक यू.पी. चीलवेरवार, जितेंद्र राहुड ,राजू नागरे , संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ खान पठाण हेही प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.