तंटामुक्ती समिती व महिलांनी केला आंधळी गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार

दारू विक्रेत्यावर होणार दंडात्मक कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 सप्टेंबर : कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथील समाजमंदिर सभागृहात तंटामुक्ती समिती, गावकरी, महिला बचत गट व मुक्तीपथ यांच्या संयुक्त विद्यमाने दारूबंदी संदर्भात सभा पार पडली. यावेळी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन दारू विक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले. तसेच निर्णयाचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड व शासकीय दाखल्यांपासून वंचित ठेवण्याची तंबी देण्यात आली.

या सभेत दारूबंदी संघटना पुनर्गठीत करून अध्यक्षपदी कविता कोटनाके, उपाध्यक्ष विद्या कराडे, सचिव अरुणा दूधकुवर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या संघटनेच्या बचत गटाच्या महिल्या या सदस्य असणार. दरम्यान सभेत दारुविक्रेत्यांवर  दारू विक्री केल्यास 50,000/- दंड, सर्व ग्रामपंचायत स्तरावरील कागदपत्रे व तलाठी कार्यालयातील मिळणारे कागदपत्रे बंद, दंड न भरल्यास स्थावर मालमत्ता पोलीस पाटलांच्या उपस्थितीत जप्त करण्याचे ठरले. त्याचवेळी गावातील दारू विक्रेत्यांना बोलावून त्यांच्या कडून दारूविक्री न करण्याची हमी घेण्यात आली व तसेच विक्री केल्यास सभेनी ठरवलेल्या नियमांना सामोरे जाण्याचे त्यांच्याकडून लिहून घेतले.

यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संघमित्रा कराडे, उपाध्यक्ष खुशाल कवाडकर, सरपंच उज्वला रायसिडाम, उपसरपंच अप्रव भैसारे, पोलिस पाटील प्रकाश जनबंधू, ग्रांप. सदस्य, तंटामुक्ती समिती सदस्य तसेच गावातील महिला वर्ग व पुरुष मंडळी, मुक्तीपथ तर्फे तालुका संघटक मयूर राऊत व कार्यकर्ते सतीश बागडे उपस्थित होते.

हे पण वाचा :-