अनुदानाअभावी शिक्षकांचे वेतन रखडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ८ जानेवारी:-  वेतन शीर्षकाखाली मिळणाऱ्या अनुदानाअभावी माहे सप्टेंबर पासूनचे आदिवासी उपयोजन क्षेत्रांअंतर्गत (हेड1901) वेतन रखडल्याने जिल्हातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांवर आर्थिक विवेचनाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली यांनी अनेकदा निवेदन व विचारणा करून प्रलंबित वेतन देण्याची मागणी केली होती.        

खाजगी शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन शीर्षकाच्या माध्यमांतुन मिळणारे वेतन अपुरे आहे. त्यातही शिक्षकांचे सप्टेंबर 2020 पासूनचे वेतन मिळालिले नाही. प्रलंबित वेतन देण्यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटने तर्फे शिक्षण विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी शिक्षकांवर आर्थिक विवंचनेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अनेक महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य, लग्न, कशी करावीत या विवेचनात कर्मचारी सापडले आहेत. वेतनेवर अनुदान प्राप्त झाले नसल्याने जि. प. शिक्षण विभागाकडून संगितले.