लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ब्रिस्बेन, 01 नोव्हेंबर :- बुधवारी एडिलेड ओव्हलच्या मैदानात टीम इंडिया आणि बांग्लादेशची टीम आमने-सामने येणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. दोन्ही संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये स्थान प्राप्त करण्याच्या उद्देशाने खेळणार आहेत. मात्र एडिलेड ओव्हलमध्ये होणार्या मॅचवर हवामानाचा परिणाम होउ शकतो. आज मंगळवारला एडिलेडमध्ये जोरदार पाउस झाला असून थंडावा जास्त वाढलाय.
या टी-20 वर्ल्ड कप मध्ये अनेक मॅच पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे टीमचे सेमीफायनलचे समीकरण बिघडले आहे. उद्या जेव्हा बांग्लादेश विरूध्द टीम इंडिया मैदानात उतरेल, त्यावेळी पावसाने व्यत्यय आणू नये अशी प्रार्थना होत आहे. मात्र, वेदर रिपोर्टनुसार उद्या सुध्दा एडिलेड मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मॅच सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. हवामान विभागाने दिवसभर ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी पावसामुळे टीम इंडियाला इंडोर सराव करावा लागला आहे.
भारत-बांग्लादेश मॅच पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही टीम्सच्या सेमीफायनल प्रवेशाच्या अपेक्षेला मोठा धक्का बसणार आहे. पाॅईंटस टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडिया तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवासह चार पाॅईंटससह दुसर्या स्थानावर आहे. बांग्लादेशचे ही चार पाॅईंटस आहेत. मात्र, नेट रनरेटमध्ये ते भारतापेक्षा मागे आहेत. त्यामुळे तिसर्या स्थानावर आहेत. पावसामुळे जर हा सामना झाला नही, तर दोन्ही टीम्सना कुठल्याही परिस्थितीत पुढची मॅच जिंकने आवश्यक आहे. नेट रनरेटही सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
हे देखील वाचा :-