जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असणाऱ्या देहड या गावात हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात दहा शेळ्यांचा मृत्यु

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. 30 जानेवारी: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असणाऱ्या देहड येथे राजू बावस्कर यांच्या शेतात सकाळच्या सुमारास हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात गोठ्यात बांधून ठेवलेल्या 10 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात या शेळ्यांचा मृत्यू झाला असून गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ठार झालेल्या शेळ्यांमुळे राजू बावस्कर यांचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
वनविभागाचे कर्मचारी व तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला असून या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केला असल्याची माहिती भोकरदन येथील वनपाल आसाराम राठोड यांनी दिली. दरम्यान लांडग्याने आज 11 शेळ्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे, तर वनविभाग या हिंस्र प्राण्याचा शोध घेत असून हा हल्ला लांडग्यानेच केला असल्याची माहिती वनपाल आसाराम राठोड यांनी दिली.