लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उरण, 10 ऑक्टोबर :- रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चिरनेर रस्त्यावरील टाकीगाव स्थानका समोर स्कुटर व टेम्पो यांचा अपघात होऊन स्कुटी चालक वैभव म्हात्रे(अलिबाग हाशिवरे) याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
चिरनेर भोम रस्त्यावरून खारपाडाकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोनी चिरनेरकडून येणाऱ्या स्कुटी चालकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( अलिबाग हाशिवरे) या तरुणाला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर टेम्पो चालक सलिम हुसेन व त्यांचा साथीदार अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आहे.
उरण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हे देखील वाचा :-
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात 12 फुटी अजगर पकडला.