लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 ऑक्टोंबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 13 वर्ष व देशाचे पंतप्रधान म्हणून 7 वर्ष असे एकूण 20 वर्ष संविधानिक पद यशस्वीपणे भूषविल्याबद्दल सेवा ही समर्पण उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमा अंतर्गत धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी केंद्र शासनाच्या विविध योजना किसान सन्मान योजना, मोफत अन्न-धान्य योजना, उज्वला गॅस योजना, शोचालय व घरकुल योजना तसेच कामगारांना मोफत अर्थसहाय्य, कोरोना काळात पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला लाभार्थ्यांना आर्थिक मदत अशा विविध योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सदर योजनांचा लाभ घेणारे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद व आभार व्यक्त करणारे पोस्टकार्ड दिल्लीला पाठवीत आहेत.
काल दि. 10 ऑक्टोबर रोजी खा. अशोक नेते हे पेंढरी परिसराच्या दौऱ्यावर असताना केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थी नागरिकांनी मा पंतप्रधानांचे आभार व धन्यवाद व्यक्त करणारे पोस्टकार्ड दिल्लीला पाठविण्यासाठी खा. अशोक नेते यांच्याकडे सुपूर्द केले.
याप्रसंगी आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, तालुका महामंत्री विजय कुमरे, पेंढरीचे सरपंच पप्पुजी येरमे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 7 वर्षात अनेक लोकाभिमुख, शेतकरी हिताच्या योजना अंमलात आणल्या. सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या. त्याचा लाभ सर्वांनाच मिळत आहे त्यामुळे अनेक गावातील नागरिक आदरणीय पंतप्रधानांचे धन्यवाद व आभार मानणारे पोस्टकार्ड पाठवित आहेत असेही खा. अशोक नेते यांनी सांगितले.