‘त्या’… महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

० जखमी महिलेला झोळीत उचलुन डोगंराळ भागात केली चार किलो मिटरची पायपिट. ० कर्जत रेल्वे पोलीसांची कामगिरी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क : पळसधरी ते खंडाळा या घाटात रेल्वे ट्रॅक शेजारी एक महीला निपचित पडली असल्याची माहिती कर्जत रेल्वे पोलीसांना कंट्रोंल रुम मधुन मिळाली.  लागलीच कर्जत रेल्वे पोलीसांची टीम घटना स्थळाकडे रवाना झाली.

लोणावळा दिशेला 106/12 ते 106/14 किमी दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या मिडल लेनवर एक आदिवासी महिला बेशुद्धांवस्थेत पडलेली दिसुन आली.  केळवली स्टेशनपर्यंत रुग्णवाहीका पोहोचणे शक्य असल्याने झोळी बनवुन सदर महिलेला झोळीत टाकुन रेल्वे पोलिसांनी डोंगर भागात चार किलोमीटरची पायपिट करीत केळवली स्टेशन गाठले.

त्यानंतर सदर महिलेवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.  ३१ मे रोजीची हि घटना असुन आशाताई वाघमारे वय ४२ रा. कार्ला, ता. मावळ असे सदर जखमी महिलेचे नाव आहे.  लाईनमन मयुर शेळके याने स्वतःचा जीव धोक्यात घालत एका चिमुकल्याचे प्राण वाचवले हि घटना ताजी असतांनाच रेल्वे जवानांनी पायपिट करुन एका असहाय्य आदिवासी महीलेचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे.  या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे कर्मचारी कौतुकाचा विषय बनले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक टि.एन.सरकाळे, पोलीस शिपाई निकेश अनंता तुरडे, पोलीस शिपाई मंगेश पाडुंरग गायकवाड, पोलीस नाईक ज्ञानेश्वर खंडु गांगुर्डे,  कोडींराम बनसोडे पोलीस  काँन्स्टेबर RPF, तसेच होमगार्ड वि.डी. लोभी यांनी हि यशस्वी कामगीरी केली आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!

lead storyrailway police