सिटु संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका च्या भव्य आंदोललेाने प्रशासन हादरले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 03 जानेवारी : 35 दिवसा पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करुनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जिल्ह्यातील आगमना प्रसंगी जबाब दो आंदोलन करन्यात आले. किमान 26000 रु वेतन देन्यात याव्ये, गैज्युट्री देन्यात यांवी, सर्वाना 5000 रु पेन्शन देण्यात यावी या मागण्या घेऊन हे आंदोलने करण्यात आले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमानात तैनात करण्यात आला होता.
35 दिवसापासून सरकार लक्ष देत नसल्याने महिलांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झालेला आहे.
गडचिरोली च्या मुख्य रस्त्यावर अभिनव लॉन जवळ आंदोलने करन्यात आले. या आंदोलनात रमेशचंद्र दहिवडे, अमोल मारकवार, अरुण भेलके, डॉ.धर्मराव सोरदे, उज्वला उंदिरवाडे, कौशल्य गोरकार, सुशीला मंगरे, योगिता मुनघाटे, सुनंदा बावने, छाया कागदेलवार, अर्चना ढवळे, माधुरी चुनारकर, अर्चना रामटेके, राजेश्री ताई लेखामी फकिराजी ढेंगणे, प्रेमिला झाडे ईत्यादी सेविका सह 845 महिला सहभागी झाल्या होत्या.

तसेच या आंदोलनात शेकाप चे भाई रामदास जराते, अक्षय कोसनकर, बिआरएसपी चे राज बन्सोड, आदिवासी युवा संघटनेचे कुनाल कोवे, रिपब्लिकन पक्षाचे उदिरवाडे साहेब यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.अमोल मारकवार यांनी मागण्या चे निवेदन  मुख्यमंत्री साहेबांना देऊन मागण्या मान्य करन्याची विनंती केली.

हे पण वाचा :-